मी माझ्या पेहराव्यातुन निवडुन घेतो शृंगारिक ,
अस्पृश्य आणि अधोगतीला लावणारे काटे.
बोटांची पेरे रक्तबंबाळ होतात पण काय मिळत?
पुन्हा वाट पाहत बघत रहायच त्याच्याकडे.
पुन्हा एका सुकलेल्या टाचेला पाहन कुठल्याश्या कणखर दगडावरती .
पुन्हा एकदा माझ परतन रस्त्याच्या बंद बाजु कडून,
अन पुन्हा एकदा अपेक्षांनी मन भरुन येन.
कित्येकदा आपण रंगसंगतीच्या कोलजातुन निवडुन घेतो जांभळट हिरवा रंग ,
आपण पुस्तकांच्या थरातुन काढून घेतो आपल आवडत वाक्य ,
आपण निसर्गाच्या कृपेतुन चोरून घेतो एक अविक्षुब्ध क्षण.
कित्येकदा छोट्या उश्या बिछान्या खालीच पडुन असतात आणि

आपण तरीही घेऊ शकतो सकाळची गाढ झोप .
फक्त तेवढच असत आपल अस्तित्व .
कित्येकदा आपण लपवुन टाकतो त्याच्या नसण्यातला फरक.
आपण औदासिन्याला दुसर्या कुठल्या रसायनात मिळवून टाकतो .
आपण स्वताच्याच आनंदाचे विरोधक होऊन जातो .
जिथे क्षण भराची ही उसंत घेण अश्यक्य होत त्या कामातून

कित्येकदा तो अचानक परतुन येतो.
सोयीस्कर खोटेपणाच्या घोंगडी खाली आपण कित्येकदा सत्य लपवून टाकतो.
कित्येकदा
वादळाच्या मध्ये आपण पाहतो एक अस्पष्ट चेहरा ,
पावसाच्या सरीत ऐकू येतो एक अनोळखी आवाज ,
आपण शहारून उठतो की कुणी तरी स्पर्श केलाय आणि तरीही कुणी च नाहीय.
कित्येकदा आपण ते नसतोच ,जे रोज असतो . तेच असायला हव असत.
9 जुलै 2014)
बुद्धाच्या कपाळावरुन निसटुन पडलेल्या इच्छांचे धागे,
ग्रीक देवतांच्या तीक्ष्ण नाकांनी उकरले गेलेले शब्द ,
मंदिरांच्या प्रवेशद्वारांवर आणि भिंतीवर असलेले सजीव कमनीय सौंदर्य,
निषिद्ध रेषेच्या आसपास हवेत स्थिरावलेला राक्षस ,
वणव्यात पेटलेल्या जंगला मधल्या जमिनीवर उगवलेले हिरवे कोंब ,
आगीच्या तांडवात मृत्युला चुंबुन पुन्हा जिवंत होणारा पक्षी.
आणि विचारांच्या भोवर्यात अडकलेला मी .
सगळच जे अशक्य आहे माझ्यासाठी
,ते सगळच विखुरलेल आहे माझ्या आसपास.
* * *
ज्यात वाळु ही नसेल अन वारा ही नसेल
तर त्या धुळीच्या वादळाला काय अर्थ असेल?
तू ही नसशील आणि जर मी ही नसेल
तर आयुष्याला काय बर अर्थ असेल?
- के सी { हिंदी}
#rosswords
#translations
No comments:
Post a Comment