अरे
हो..त्या दिवशीची गोष्ट अर्धीच राहुन गेली न.
खर तर ती सुद्धा अशीच बोलते ,
" अरे तुला तर मी हे सांगितलच नाही ..कसे कसे लोक असतात यार.."
आणि मग अशी एखादी गोष्ट सांगितली जाते जी फक्त ती
आणि तीच इतक्या वेगळ्या शैलीत सांगु शकते.
अहो बघण्याची मजा तर तेव्हा असते जेव्हा ती काही तरी सांगत असते
आणि मी तिला काही तरी भरवायचा प्रयत्न करत असतो.
जगातल्या सगळ्या सुंदर कामात मला आवडनार कोणत काम असेल
तर ते म्हणजे तिला माझ्या हातांनी जेवण भरवण.
कधी कधी तर ती श्वास न घेता अखंड बडबड करत असते
(कुठलीही गोष्ट सांगायची तर ती अशीच सांगते)
आणि जेव्हा मी घास पुढे करतो तेव्हा ती म्हणते ," नाही ...थोडं तु खा , मला एवढं जाणार नाही"
(ते सुद्धा जरास तोंड वाकड करत) अन् मग त्याच लयीत पुढची बडबड सुरु.
तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो.
हसु येऊ शकत किंवा नाही सुद्धा येणार.
एकदा ती काहीतरी सांगता सांगता स्वतःच झोपुन गेली
आणि तिच्या केसांना बोटांनी सोडवत राहिलो.
थोड्यावेळाने अचानक झोपेतुन उठली आणि उदास आवाजात म्हणाली ,
" अरे मी विसरले ..काय बर सांगत होते तुला मी"
त्या क्षणाला पहिल़्यांदा जाणवल की हो खरच कदाचित मी प्रेमात आहे .
जे आपल्या ह्रदयावर ताबा मिळवुन असतात भल्या मोठ्या लांब साखळदंडाने
त्यांनी आपल्याला जखडुन ठेवलेल असतं .
आपण बंधनात आहोत ही जाणिव तेव्हा समजते जेव्हा
चालता चालता अचानक काहीतरी मागं ओढुन नेतं.
तोच फक्त एक क्षण असतो जेव्हा कळुन चुकत की आपलं सुख
हे फक्त आपल्या पुरता मर्यादित राहीलेलं नाही.
आपण बंदी आहोत.
ह्यातच एक प्रकारचा आनंद सुद्धा आहे की
तुम्ही कुठेतरी बेफिकीर होऊन निघालात आणि अचानक
ती हात पकडून म्हणते 'अरे ऐक ना! '
कधी कधी लगाम सुद्धा गरजेचा असतो.
आणखी एक गोष्ट सांगुनच टाकतो.
तुम्ही कधी लक्ष देऊन पाहिलं तर कळेल दोन एकमेकांवर प्रेम करनाऱ्या व्यक्ति
जेव्हा भेटतात तेव्हा बाकी काहीही हो एक क्षण जो असतो तो सर्वात सुंदर असतो.
निरोपा आधीचा क्षण...
जेव्हा दोघही शांत असतात.
आणि विचार करत असतात की काय काय बोलायच होत एकमेकांशी
आणि कुठ ह्या जगाच्या गप्पांमध्येच
आयुष्याच्या भिंती वरुन ही मोहक संध्याकाळ निसटून गेली.
गोल चेहर्याची ती मुलगी जेव्हापण भेट घेऊन निघत असते
तेव्हा शेवटच्या क्षणांकरता माझ्याकड बघण ती टाळत असते.
आणि त्या दरम्यान ती कुठेही बघु देत ,
काहीही बोलु देत , काहीही करु देतपण
मला मात्र वाटत असतं की शेवटी मी माझ्या आयुष्यात प्रेमाच्या योग्यतेचा बनलोय.
तिच्यात फक्त एक छोटा दुर्गुण आहे की तिला माहितीय
तिच्या कोणत्या छोट्या छोट्या गोष्टींवर माझ्या डोळ्यांमध्ये पाणी येईल.
कोणीतरी जेव्हा आपल्याला एवढं ओळखायला लागत
तेव्हा साहजिकच थोडी भिती प्रेमासोबत मिसळुन डोळ्यावाटे मज्जातंतुं पर्यंत पोहचते.
आता मात्र झोपावं लागेल कारण जर तिला कळालं की
मी रात्र भर झोपलो नाही तर माझ्या हातुन ती एक घास सुद्धा खाणार नाही.
ती तोंड फिरवुन घेईल आणि म्हणेल
,"मला भुक नाहीय आणि वरुन एवढे मोठे घास ?
मला बोलायचच नाही आणि मला काही खायच सुद्धा नाही ..आला मोठा!! "
--- आनंद बाजपेयी (हिंदी)---
स्वैर अनुवाद - रोशन
#rosswords
#baithkee

No comments:
Post a Comment